शनिवार, १५ एप्रिल, २०२३

जेईई ऍडव्हान्स परीक्षा 4 जूनला

 


पुणे -देशातील आयआयटी, एनआयटी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई ऍडव्हान्स परीक्षा येत्या 4 जूनला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जेईई मेन्समधील पात्र ठरलेल्यांची जेईई ऍडव्हान्स परीक्षा देश-विदेशातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. जानेवारीमध्ये पहिले सत्र झालेले असताना नुकतेच एप्रिल महिन्यात जेईई मेन्सचे दुसरे सत्र झाले होते. या दोन्ही परीक्षांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन्हींपैकी सर्वोत्तम पर्सेंटाइल ग्राह्य धरून राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल. या क्रमवारीच्या आधारावर जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता निश्‍चित होणार आहे.

ही परीक्षा दरवर्षी देशातील आयआयटी संस्थांद्वारे घेण्यात येते. यंदा ही जबाबदारी गुवाहाटी येथील आयआयटीकडे आहे.

परीक्षेचे वेळापत्रक

अर्ज करण्यास सुरुवात : 30 एप्रिल

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 7 मे

शुल्क भरण्याची अंतिम मुदत : 8 मे

हॉलतिकीट उपलब्ध : 29 मेपासून

परीक्षेची तारीख : 4 जून

परीक्षेचा निकाल : 24 जून


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...