भरजरी साडी, कपाळावर भंडारा, गळ्यात लिंबं बांधलेल्या एका व्यक्तीचा फोटो समोर आला आहे. या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?
सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे जो पाहून अंगावर काटे उभे राहिले आहेत.
भरजरी साडी, गळ्यात लिंबांचा हार आणि करारी नजरेत पाहणाऱ्या या व्यक्तीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ही व्यक्ती देवीच्या रूपात दिसत आहे. एकीकडे देवीचे दागिने, वस्त्र तर दुसरीकडे हातात पिस्तुल घेऊन उभी आहे.
मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर पुष्पा 2 ची पहिली झलक समोर आली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून पुष्पाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.
कलरफुल कपड्यांमध्ये आपल्या स्वॅगमध्ये खुर्चीत बसलेल्या पुष्पाची नवीन झलकही पाहायला मिळत आहे.
पुष्पा: द राइस आणि पुष्पा: द रूल मध्ये अल्लू अर्जुनचे काही लुक्स आणि पोझेस अगदी सारखे असल्याचं पाहायला मिळतंय.
स्त्री वेशात असलेल्या अल्लू अर्जुनला ओळखणंही कठीण झालं आहे. सिनेमाची पहिली झलक पाहून प्रेक्षकांनी प्रेम आणि पसंती दर्शवली आहे.
सौजन्य: https://lokmat.news18.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा