रोकड मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली. इन्कम टॅक्स विभाग यापुढचा तपास करत आहेत.
रोकड मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली. इन्कम टॅक्स विभाग यापुढचा तपास करत आहेत.
फरिदाबाद - हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्री जीएसटी विभागाने सेक्टर ९ मध्ये राहणाऱ्या उद्योगपतीच्या निवासस्थानी धाड टाकली.
इन्कम टॅक्स न भरता कंपनीचं काम सुरू होते असा आरोप जीएसटी खात्याचा आहे. GST विभागाने उद्योगपतीच्या निवासस्थानी धाड टाकली तेव्हा जवळपास ३ कोटी रुपये रोकड हाती लागली. भिंतींमध्ये ही रोकड लपवण्यात आली होती.
राज्य GST विभागाने आयकर खात्याला ही माहिती देत रोकड त्यांच्याकडे सुपूर्द केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सेक्टर ६ परिसरात उद्योगपतीची फॅक्टरी आहे. जीएसटी चोरी करून सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोप उद्योगपतीवर आहे. उद्योगपतीच्या कारखान्यात हँड टूल्स बनवले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील भिंत तोडून रोकड जप्त करण्यात आली.
रोकड मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली.
विभाग यापुढचा तपास करत आहेत. हरियाणाच्या नूँह जिल्ह्यात २२ मार्च रोजी आयकर विभागाने जनावरांचे व्यापारी आस मोहम्मद यांच्या घरावर धाड टाकली होती. ही छापेमारी २ तास चालली. व्यापारी आयकर कराची चोरी करत असल्याची तक्रार काहींनी केली होती. त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली.
सौजन्य: https://www.lokmat.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा