रविवार, ९ एप्रिल, २०२३

चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले.

 


IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला  त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. अजिंक्य रहाणे या विजयाचा हिरो ठरला. शिवाय शिवम दुबे व तुषार देशपांडे या मुंबईकरांनीही CSKच्या विजयात हातभार लावला. MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.  

आयपीएल २०२३  मध्ये मुंबईला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि आजच्या विजयानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. 

जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध हल्लाबोल केला. अजिंक्यने २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. अजिंक्यने सेट केलेला टेम्पो ऋतुराज व मुंबईकर शिवम दुबेने ( २८) कायम राखला आणि ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू व ऋतुराजने चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. ऋतुराज ४०, तर रायुडू २० धावांवर नाबाद राहिले. चेन्नईने १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा केल्या.

रोहित म्हणाला, चांगल्या सुरूवातीनंतर आम्ही हरलो.. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्हाला आता अधिक धाडसी खेळ करायला हवा. युवा खेळाडूंच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहिलो आहोत आणि त्यांना वेळ द्यायची गरज आहे. आता संघातील सीनियर्सनी पुढाकार घेऊन चांगले खेळायला हवं, हे मी माझ्याबाबतीतही बोलतोय.. अजून स्पर्धा बाकी आहे आणि आता तो विजयाचा क्षण आणण्याची गरज आहे.

सौजन्य :https://www.lokmat.com/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...