गुरुवार, २० एप्रिल, २०२३

IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही प्रामाणिक…’

IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, 'आम्ही प्रामाणिक...'




दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव संघ आयपीएल 2023  स्पर्धेत सातत्याने पराभवाचा सामना करत होता. दिल्लीने सलग खेळलेल्या पहिल्या पाचही सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र, या पराभवाला ब्रेक लावण्याचे काम आपल्या सहाव्या आणि स्पर्धेच्या 28व्या सामन्यात केले. गुरुवारी (दि. 20 एप्रिल) दिल्ली संघाने कोलकातावर शेवटच्या षटकात 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. हंगामातील पहिला विजय मिळवताच कर्णधार डेविड वॉर्नर भलताच खुश झाला. सलग 5 पराभवांनंतर हा विजय दिल्लीसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला. वॉर्नरने या विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजांना दिले. त्याने असेही म्हटले की, आम्हाला फलंदाजीत खूप काम करण्याची गरज आहे. 


वॉर्नरचे भाष्य

सामन्यानंतर बोलताना डेविड वॉर्नर (David Warner) म्हणाला की, “दोन गुण मिळणे खूपच शानदार ठऱले. वास्तवात आम्हाला आमच्या गोलंदाजी फळीचा अभिमान आहे. आम्ही पॉवरप्लेमध्ये त्यांच्याकडून विकेट्सची मागणी केली आणि त्यांनी ही मागणी पूर्ण केली. होय, आम्हीही फलंदाजीदरम्यान एकदम विकेट्स गमावल्या. आम्ही याबाबतीत एकमेकांशी खूपच प्रामाणिक आहोत आणि ज्या विभागांवर सुधारणेची गरज आहे, त्यावर चर्चाही करतो. आजचा सामना ठीक-ठाक राहिला.”

दिल्लीचा पहिला विजय

दिल्ली कॅपिटल्स संघ गुरुवारी सायंकाळी 
 (Nitish Rana) याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरला होता. दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या संपूर्ण संघाला 127 धावांवरच गुंडाळले होते. यानंतर दिल्लीच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, दिल्ली संघही नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला. त्यामुळे झाले असे की, दिल्लीला सामन्याच्या शेवटच्या षटकात विजय मिळाला. दिल्लीने कोलकाताच्या 128 धावांचे आव्हान 6 विकेट्स गमावत 19.2 षटकात गाठले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने 4 षटकात 19 धावा खर्च करत 2 विकेट्स चटकावल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.



दिल्लीला सलग सामन्यात मिळवावा लागेल विजय

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या गुणतालिकेत तळाशी असून त्यांचे 2 गुण आहेत. अशात त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या 8 सामन्यांपैकी 6 किंवा 7 सामन्यात विजय मिळवावा लागेल. म्हणजेच त्यांना सलग सामने जिंकावे लागतील. जर दिल्लीला पुढील सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांना पुढे यावे लागेल. या हंगामात डेविड वॉर्नर याच्याव्यतिरिक्त दिल्लीचा इतर फलंदाज नियमित चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. (skipper david warner on delhi capitals first win in ipl 2023 after five defeats dc vs kkr)

संदर्भ:https://mahasports.in


















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...