शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्रकार ? Domain Name म्हणजे काय ? Domain Name कसे तयार करायचे ?"


  • Domain Name म्हणजे काय ?
What is Domain Name Meaning in Marathi तुम्ही जेव्हा कधी एखादी कोणती website search करतात त्यावेळेस तुमचा सर्वात पहिला contact हा Domain Name सोबत होतो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा नक्कीच विचार आला असेल की एका Website चे आणि Domain Name ची काय relation आहे. तर तुमचा या प्रश्नाची निवारण करण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की Domain Name च्या मदतीने आपण वरती website शोधू शकतो.

आपण याला असे सुद्धा म्हणू शकतो की हे एक friendly naming system आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या webpage किंवा  ला शोधू शकतो. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा Domain Name म्हणजे काय याबद्दल थोडीफार का होईना information नक्कीच असेल परंतु खूप काही व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांना Domain Name म्हणजे काय याबद्दल काहीही information नाही त्यामुळे आज मी या ठिकाणी मध्ये Domain Name बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की Domain Name म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने आपण शकतो. 

Domain Name म्हणजे काय Domain Name किंवा  हे कशा प्रकारचे नाव आहे त्याच्या मदतीने आपण कोणत्याही website ला online internet वरती search करू शकतो. जर आपण एखाद्या website बद्दल बघितले तर सर्व website background मध्ये कोणत्या ना कोणत्या IP Address सोबत जोडले गेलेले असते. ( IP Address ) हा एक numerical address आहे जे browser ला सांगतात की इंटरनेटवर ती website कोणत्या ठिकाणी available आहे.






गुरुवार, २० एप्रिल, २०२३

IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही प्रामाणिक…’

IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, 'आम्ही प्रामाणिक...'




दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव संघ आयपीएल 2023  स्पर्धेत सातत्याने पराभवाचा सामना करत होता. दिल्लीने सलग खेळलेल्या पहिल्या पाचही सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र, या पराभवाला ब्रेक लावण्याचे काम आपल्या सहाव्या आणि स्पर्धेच्या 28व्या सामन्यात केले. गुरुवारी (दि. 20 एप्रिल) दिल्ली संघाने कोलकातावर शेवटच्या षटकात 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. हंगामातील पहिला विजय मिळवताच कर्णधार डेविड वॉर्नर भलताच खुश झाला. सलग 5 पराभवांनंतर हा विजय दिल्लीसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला. वॉर्नरने या विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजांना दिले. त्याने असेही म्हटले की, आम्हाला फलंदाजीत खूप काम करण्याची गरज आहे. 


वॉर्नरचे भाष्य

सामन्यानंतर बोलताना डेविड वॉर्नर (David Warner) म्हणाला की, “दोन गुण मिळणे खूपच शानदार ठऱले. वास्तवात आम्हाला आमच्या गोलंदाजी फळीचा अभिमान आहे. आम्ही पॉवरप्लेमध्ये त्यांच्याकडून विकेट्सची मागणी केली आणि त्यांनी ही मागणी पूर्ण केली. होय, आम्हीही फलंदाजीदरम्यान एकदम विकेट्स गमावल्या. आम्ही याबाबतीत एकमेकांशी खूपच प्रामाणिक आहोत आणि ज्या विभागांवर सुधारणेची गरज आहे, त्यावर चर्चाही करतो. आजचा सामना ठीक-ठाक राहिला.”

दिल्लीचा पहिला विजय

दिल्ली कॅपिटल्स संघ गुरुवारी सायंकाळी 
 (Nitish Rana) याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरला होता. दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या संपूर्ण संघाला 127 धावांवरच गुंडाळले होते. यानंतर दिल्लीच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, दिल्ली संघही नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला. त्यामुळे झाले असे की, दिल्लीला सामन्याच्या शेवटच्या षटकात विजय मिळाला. दिल्लीने कोलकाताच्या 128 धावांचे आव्हान 6 विकेट्स गमावत 19.2 षटकात गाठले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने 4 षटकात 19 धावा खर्च करत 2 विकेट्स चटकावल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.



दिल्लीला सलग सामन्यात मिळवावा लागेल विजय

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या गुणतालिकेत तळाशी असून त्यांचे 2 गुण आहेत. अशात त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या 8 सामन्यांपैकी 6 किंवा 7 सामन्यात विजय मिळवावा लागेल. म्हणजेच त्यांना सलग सामने जिंकावे लागतील. जर दिल्लीला पुढील सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांना पुढे यावे लागेल. या हंगामात डेविड वॉर्नर याच्याव्यतिरिक्त दिल्लीचा इतर फलंदाज नियमित चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. (skipper david warner on delhi capitals first win in ipl 2023 after five defeats dc vs kkr)

संदर्भ:https://mahasports.in


















वेबसाईट कशी बनवायची ? How to Make Website in Marathi ? वेबसाईट म्हणजे काय ? वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

वेबसाईट कशी बनवायची,How to Make Website in Marathi,वेबसाईट म्हणजे काय,एक व्यक्ती Website Visit का करतात,वेबसाईट कशी तयार करतात,Website बनवण्यासाठी कोणत्या Programming चा उपयोग केला जातो,वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?


  • वेबसाईट कशी बनवायची ?

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्वतःची एक वेबसाईट कशी तयार करायची  त्यासोबतच client साठी किंवा इतर व्यक्तींसाठी वेबसाईट कशी निर्माण करायची याबद्दल माहिती बघणार आहोत. याबद्दल माहिती नाही आहे असा कोणताच व्यक्ती नाही. internet च्या मदतीने आपल्याला जा topic बद्दल information हवी असेल त्या topic ची information आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. या प्रकारची information आपल्याला Search Engine प्रदान करतात ती सर्व information कुठून ना कुठून येत असते, किंवा कोणतेही एखाद्या website owner नाही किंवा  ती information लिहून publish केलेली असते त्यानंतरच आपल्याला ती वाचायला मिळते. त्यामुळे खूप सार्‍या लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की किंवा वेबसाइट कशी बनवायची, वेबसाईट कशी निर्माण होते,

याचे उत्तर तुम्हाला एका शब्दात सांगण्याइतपत सोपे नाही. Website बनवण्यासाठी संपूर्ण process ला सामोरे जावे लागते, आणि याला समजून घेण्यासाठी तुम्हाला How to Make Website in Marathi वेबसाईट कशी बनवायची या article ला संपूर्ण वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. internet user असल्यामुळे तुम्ही सुद्धा online खूप सार्‍या website बघितले असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का या सर्व वेबसाईट कशा तयार होतात ? जर माहिती नसेल तर चिंता करण्याची काहीही हरकत नाही आज पण या आर्टिकल मध्ये याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत. 

यामध्ये आपल्याला वेबसाईट म्हणजे काय, वेबसाईट कशी तयार केल्या जाते याबद्दल सुद्धा पुरेपूर माहिती मिळेल, त्यामुळे आज मी असा विचार केला की वेबसाईट कसे तयार करायचे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये द्यावी. आणि होऊ शकते की या article च्या मदतीने तुम्हाला काही नवीन शिकायला भेटेल. जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या मुख्य topic कडे वळूया तो म्हणजेच वेबसाइट तसेच निर्माण करायची.

  • वेबसाईट म्हणजे काय ?

website एक web pages चे collection असते ( web pages म्हणजे : अशा प्रकारचे document ज्यांना internet द्वारा access केल्या जाऊ शकते ), आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची एक web page तुमच्या समोर आता बघत आहात. एक web page ते असते ज्यांना तुम्ही तुमचा phone चा किंवा laptop चा screen वरती बघू शकतात, जेव्हा तुम्ही एका web address ना type करतात, त्यानंतर कोणत्याही एखाद्या link वरती click करतात किंवा एखादी information search engine वरती search करतात.

त्यानंतर तुम्हाला एक web page show केला जाते त्या ठिकाणी एका web page मध्ये कोणत्याही प्रकारची information असू शकते जसे की, Text, Video, Animation, व्हिडिओ, Audio, Sound इत्यादी मोठ्या प्रमाणात. जेव्हा तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एक web address असतो त्यावेळेस तो generally त्या website चा ठरतो, याच्या मदतीने तुम्ही त्या website मध्ये कोण कोणती information आहे याबद्दल माहिती प्रदान करू शकता. त्या home page मधून तुम्ही वेगवेगळ्या section पर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि इतर content वाचू शकता. या website मध्ये एक page किंवा खूप सारे pages असू शकतात, हे सर्व निर्भर करते की त्या website चा मालक आपल्या येणाऱ्या visitors साठी किती information प्रदान करत आहेत.

एक व्यक्ती Website Visit का करतात वेबसाईट म्हणजे काय याबद्दल आपण आत्ता चर्चा केली आहे, त्यासोबतच याबद्दल सुद्धा आपण माहिती बघूया त्याआधी एखादा user website कोणत्या कारणासाठी visit करतो याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ते बघुया. साधारणपणे असे बघितले गेले आहे की लोकं मुख्य करुन दोन कारणासाठी कोणत्याही एखाद्या website visit करत असतात किंवा बघत असतात. त्यांना आपल्याला आवश्यक असणाऱ्या information ची आवश्यकता असते, ती information काहीही असू शकते जसे की एखादा student आपल्या school home work साठी एखाद्या पक्षाचे चित्र शोधत असेल, 

किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही एखाद्या product ची price check करत असेल या प्रकारची कोणतीही information चा समावेश त्यामध्ये असू शकतो. एक task पूर्ण करण्यासाठी एखाद्या visitor ला latest smartphone ची आवश्यकता आहे purchase करण्यासाठी, एखाद्या movie किंवा गाण्याला download करण्यासाठी ज्याला ती नंतर free time मध्ये बघू शकेल, यासोबतच एखाद्या online discussion मध्ये participate करण्यासाठी सुद्धा आपण website चा उपयोग करतो. यामध्ये मुक्त गोष्टीकडे लक्ष देण्याचे एक point आहे तो म्हणजे website आपण आपल्यासाठी बनवत नाही तर website च्या मदतीने इतरांना व्यवस्थित आणि helpful information प्रदान करण्यासाठी तयार करतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा वेबसाईट तयार करत असाल त्यावेळेस तुम्ही content हा स्वतःसाठी लिहू नका तर, तुमच्या website मध्ये येणाऱ्या visitor ल त्यापासून information आणि वेली भेटेल या हेतूने लिहावा.

  • वेबसाईट कशी तयार करतात ?
सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एकदा का तुम्ही तुमची website design केली त्यानंतर आपल्यासमोर सर्वात मोठे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे website launch कशी करायची, जर तुम्ही पहिल्यांदा website launch करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ही process तुमच्यासाठी tricky ठरू शकते. जर तुम्हाला याबद्दल काहीही कल्पना नसेल की कशाप्रकारे website ला place केल्या जाते, कशाप्रकारे website ला internet वर ती host केल्या जाते या सर्वांबद्दल तुम्हाला नक्कीच कळेल पण त्यासाठी तुम्हाला वेबसाईट कशी तयार करायचे यावर article मध्ये व्यवस्थित पणे लक्ष दोन वाचणे आहे. याबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कोणत्याही website चा सर्वात महत्वाचा part aspect असतो, 

परंतु यापेक्षा ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे तुमचा intended audience पर्यंत ती information पोहोचणे आणि visitors तुमच्या websiteवरती खूप सोप्या पद्धतीने होऊ शकणार आणि त्या विधी ठरला त्यांना आवश्यक असणारी information भेटणे. त्यामुळे तुम्हाला तुमची website launch करण्याआधी एकदा व्यवस्थित check करावे लागेल की ती website thoroughly optimizer आहे की नाही. यामुळे ते नवीन नवीन visitors ला attract करू शकतात आणि आपल्या website मध्ये होणाऱ्या activity ला track सुद्धा करू शकतात. त्यामुळे आपण आता या संपूर्ण procedure ला व्यवस्थितपणे समजून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला website launch करता वेळेस कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, चला आता आपण बघुया वेबसाईट कसे बनवतात ?

  • एक Domain Name Select आणि Register करा 

तुम्हाला एक अशा प्रकारचा domain name select करायचे आहे जे की brief ,easy to remember ( खूप सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता ) त्यासोबतच ते तुमच्या website मध्ये असलेल्या content ला सुद्धा suit करेल. काही common top level domain मध्ये असतात .com,.org, एन .in,.net जॅकी stand करतात Commercial,Educational,Organizatio आणि Network respectively. नेहमी प्रयत्न करावा की top level domain आपल्या website च्या purpose साठी match करावा, परंतु काही top level domain मध्ये real restrictions नसतात जसे की .org आणि .com त्यामुळे तुम्हाला जे नाव तुमच्या domain साठी घ्यायचे आहे ते इतर domain मध्ये सुद्धा available असू शकते.
  • Web Hosting Select करा
Domain खरेदी केल्यानंतर आपला सर्वात महत्वाचा एक part असतो तो म्हणजे करणे, आपल्या website साठी योग्य web hosting ची निवड करणे हे अत्यंत गरजेचे असते तुम्हाला माहीत नसेल तर या ठिकाणी click करून संपूर्ण माहिती बघू शकता. तुम्हाला तुमच्या website साठी योग्य web hosting ची निवड करायची आहे का सोबत bandwidth ला secured सुद्धा करायचे आहे जे तुमच्या website चा smooth running साठी necessary असते, एका expected पात्राच्या traffic साठी. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की bandwidth म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की एक जीवन time period मध्ये किती amount data transfer करण्यासाठी आपली वेळ गोष्टी allow करते. यालाच आपण bandwidth असे म्हणतात. जशी तुमची website मोठी होत जाईल तसे तुम्हाला तुमच्या website साठी bandwidth सुद्धा वाढवावी लागेल, ज्यामुळे website visitors ला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही website मधील content बघण्यासाठी, त्यांना ब्लॅक एक्सप्रेस येण्याची संभावना असते, ज्यामुळे त्यांचे user experience सुद्धा खराब होऊ शकते आणि ते तुमच्या website मध्ये परत येणार नाही. खूप सार्‍या  तुम्हाला काही  जे तुम्हाला website बनवण्यासाठी खूप मदत करतात.

  • Website File ची Backup Copy तयार करणे 
तुम्हाला तुमच्या website ची एक backup copy तुमचा स्वतःकडे ठेवायचे आहे  मध्ये, फक्त तुम्हीच करू शकाल editing करण्यासाठी, याच प्रमाणे एक copy web hosting मध्ये सुद्धा असते त्याचे उपयोग इतरांना ती copy बघण्यासाठी होते internet च्या माध्यमातून. 

  • Easy Website Navigation 
जर एखाद्या internet user ला तुमच्या website मध्ये त्याला हवी असणारी information 30 सेकंदाच्या आत मिळाली नाही तर होऊ शकते की तो internet वर पुन्हा तुमच्या website मध्ये येणार नाही, त्यामुळे आवश्यक आहे की तुम्हाला तुमच्या website ला योग्य प्रकारे organized करायचे आहे specific section मध्ये या सोबत असतो तुम्हाला link चा सुद्धा योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे यामुळे एका page मधून दुसऱ्या page मध्ये easily navigate होऊ शकते.
  • Code Validate करा
तुमच्या website मध्ये use केलेल्या HTML,CSS,XHTML,Javascript, आणि XML Code validate करायचे आहे त्यावरून आपल्याला हे कळते की आपल्या website मध्ये सर्व clean code आहे तेही योग्य स्वरूपामध्ये आणि ते योग्य प्रकारे functions करत आहे visitors साठी जसे की त्यांचे कार्य असते. तसे बघितले गेले तर internet वर ती खूप सारे program available असतात जेकी या प्रकारच्या codes ला online validate करतात.

  • योग्य SiteMap Impliment करणे
आपल्या website मधील sitemap खूप जास्त information प्रदान करतात search engine साठी, त्यामुळे ते आपल्या website ला accurately indexing करू शकते. एक sitemap एक collection असते verious URLs जे तुमच्या website मध्ये असतात. एका site ला create केल्यानंतर ते allow करतात search bots ला आपल्या website मध्ये असलेल्या essential pages असला शोधून त्यांना index करण्यासाठी.

  • Test Website in Verious Web Browser
तुम्हाला तुमच्या website ला नेहमी test करावे लागेल हे confirm करण्यासाठी की त्यांचे design आणि page strucutre व्यवस्थित रित्या display होत आहे की नाही ज्या प्रकारे त्यांना display केले गेले पाहिजे. specificially तुम्हाला तुमच्या website ला जास्त popular browser जसे की Crome,Firefox,Internet explorer,Quora आणि Safari यामध्ये बघावे लागेल कारण की या प्रकारच्या browsers उपयोग जास्त प्रमाणामध्ये internet user करतात कोणतीही एखादी querry search करण्यासाठी.

  • User Friendly Code 

नेहमी Meta आणि Alt Text चा उपयोग करायचा आहे तुम्हाला तुमच्या website मध्ये हे insure करण्यासाठी की आपली website न केवळ user searches मध्ये appear झाली पाहिजे यासोबतच आपल्या content मधील partially keyword वर सुद्धा व्यवस्थित रित्या display झाले पाहिजे. या प्रकारे content लिहिल्यानंतर तुमचे article search engine मध्ये जाण्याचे जास्त chances निर्माण होतात आणि तुमच्या website मध्ये जास्त traffic सुद्धा वाढते. 
Atl text ला picture चा description मध्ये लिहिले जाते ज्यामुळे google search bots ला आपल्या pictures बद्दल information भेटते यावरून असे कळते की search engine मध्ये असलेल्या तुमच्या website मध्ये जे कोणतेही picture आहे ते कोणत्या topic related आहे. 
  • Website Analytics Install करा 
website चा statistics बद्दल माहिती करणे हे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या website मध्ये आणि तिचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे तुम्ही लोकांचे imprints सोबत clicks, नवीन visitors या प्रकारची खूप सारी information प्रदान करू शकतात. यासोबतच तुमच्या द्वारा केल्या गेलेल्या change चा सुद्धा असर तुम्ही या ठिकाणी show करू शकता, आणि याच हिशोबाने योग्य adjustment ती करू शकता यासोबतच तुम्ही तुमच्या website च्या effectiveness ला सुद्धा वाढू शकतात.

  • Website बनवण्यासाठी कोणत्या Programming चा उपयोग केला जातो ?
 
म्हणजेच, How to Make Website in Marathi याबद्दल आपण आता वरती चर्चा केलेली आहे यावरून तुम्हाला तरी नक्कीच समजले असेल की वेबसाइट कसे तयार करतात. आता आपल्याला वेबसाईट तयार करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग केला जातो याबद्दल सविस्तर माहिती बघायची आहे ती पुढीलप्रमाणे. तसे बघितले गेले तर website बनवण्यासाठी खूप सार्‍या programming language चा उपयोग केला जातो परंतु मी या ठिकाणी तुम्हाला काही important programming language बद्दल सांगणार आहे. HTML : HTML ही एक Markup language आहे page चा formatting साठी खरंतर ही एक programming language आहेच नाही. फक्त हे एक advance punctuation असतात. CSS : CSS एका प्रकारची rule set असते जे की browser ला हे direction देण्याचे कार्यकर्ते की कशाप्रकारे HTML format content ला display केल्या जाईल. हीसुद्धा एक programming language नाही. परंतु CSS language खूप powerful असते. JavaScript : JavaScript ही एक programming language आहे याचा उपयोग website ला interactive बनवण्यासाठी केला जातो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या chrome browser मध्ये right click आणि inspect element वर JavaScript ला बघू शकता. यासोबतच तुम्हाला या बद्दल सुद्धा माहिती भेटेल की JavaScript म्हणजे काय. AJAX : AJAX हे एक extension असते.

JavaScript चे त्यामुळे ते web server ला data पोहोचू शकतात आणि त्यासोबतच purchase ला upload सुद्धा करू शकता, कोणत्याही pages ला refresh केल्याशिवाय. PHP : PHP एक प्रकारचे code असते ज्याचा उपयोग commonly जास्त प्रमाणात केला जातो सर्व site मध्ये interact करण्यासाठी file system आणि database सोबत आणि शेवटी ला हे output च्या स्वरूपामध्ये HTML तयार करतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही Paython,perl,.net आणि दुसरे language framework यांचा उपयोग यामध्ये केला जातो. MYSQL :MYSQL  Database असतात. सर्व programmers आणि developers यांना ही language शिकणे आवश्यक आहे. या ठिकाणी माझे म्हणण्याची तात्पर्य हे आहे की तुम्हाला सर्व language बद्दल काही ना काही माहिती असणे व शिकणे अत्यंत आवश्यक आहे जसे की एस HTML,CSS,Javascript,PHP,Phyton यांप्रमाणेच एक आणखीन त्यांच्या संबंधित framework याप्रमाणे खूप साऱ्या नवीन नवीन language market मध्ये आलेले आहेत ज्यामुळे ते programming ला खूप सोपे बनवतात. परंतु आपल्याला basic बद्दल माहिती असणे खूप आवश्यक असते.

  • वेबसाईट मधून पैसे मिळतात का ? 

याबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल त्या सोबत आहे website मध्ये कोणकोणत्या language उपयोग करू शकतो ज्याच्या मदतीने website तयार होते त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली असतील त्या सर्वच खूप सार्‍या लोकांच्या मनामध्ये असे सुद्धा प्रश्न निर्माण होतो की आपण बनवलेल्या वेबसाईटच्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो का तर याचे उत्तर आपण पुढे जाऊ बघूया.
एके वेळी मला सुद्धा असे वाटत होते की  की नाही किंवा ही फक्त एक अफवा आहे की नाही. परंतु मी online industry मध्ये एक गोष्ट नक्कीच शिकलेलो आहे की जर तुमच्याकडे talent असेल आणि तुम्ही पूर्ण dedication ने work करत असाल. तर तुम्ही नक्कीच 

  •  ऑनलाइन खूप चांगले पैसे कमवू शकता.

खूप लोकांना असे वाटते की आपण website तयार केल्यानंतरच पहिल्या दिवसापासूनच आपल्याला payment येणे सुरू होते परंतु असे काहीच नसते, यासाठी तुम्हाला वारंवार कार्य करावे लागते नवीन नवीन content upload करावा लागतो, लागतो, त्यानंतर तुम्हाला काही काळानंतर success भेटते. तुम्ही असे खूप वेळेस ऐकले असेल की blogger आपले दैनंदिन private job सोडून blog मध्ये आपले full time career करतात. हे सर्व खरे आहे. त्यामुळे आता आपण काही अशाच प्रकारचे मार्ग बघूया त्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकतात केव्हा, या ठिकाणी तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे पुढे सांगितले गेलेले सर्व मार्ग तुम्हाला एक सोबत implement करायचे नाही. तुम्हाला यापैकी एक किंवा दोन select करायचे आहे आणि त्यावरच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. 

  • फ्री वेबसाईट कसे तयार करायचं 
website तयार करण्यासाठी आपल्याला खूप सार्‍या गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये सर्वात पहिले आवश्यकता असते ती म्हणजे पैशाची त्यानंतर Wb hostine आणि सर्वात शेवटी ला वेळ programming जसे की HTML,CSS,Javascript, PHP,Phyton,.Net इत्यादी बद्दल पुरेपूर information असणे. 

जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही website बनविण्याचे कार्य web developers कडे देऊ शकतात, तुमच्या आवश्यकतेनुसार तो web developer तुमची website तयार करून देईल, परंतु यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे invest करावे लागेल. जर तुम्हाला याबद्दल माहिती मिळवायची असेल की तुमच्या नावाची , तर तुम्ही ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकता, खूप सारे असे website असतात जे तुम्हाला online platform प्रदान करतात त्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची online coding न करता website तयार करू शकता.

निष्कर्ष: मी आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला आमच्या वेबसाईट कशी बनवायची याबद्दल माहिती मिळाली असेल. मी नेहमी याबद्दल प्रयत्न करतो की आपल्या वेबसाईट मध्ये आलेल्या व्हिजिटर्स ला याबद्दल पुरेपूर माहिती मिळेल. ज्यामुळे त्यांना इतर कोणत्या वेबसाईट मध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे त्यांचा वेळ सुद्धा वाचतो आणि एकाच ठिकाणी त्यांना हवी असलेली संपूर्ण माहिती भेटते. 



















बुधवार, १९ एप्रिल, २०२३

संजय राऊत “मविआ’ बुडविणार; संजय शिरसाट यांची टीका

 संजय राऊत “मविआ’ बुडविणार; संजय शिरसाट यांची टीका


मुंबई – संजय राऊत आता महाविकास आघाडी बुडविणार आहेत. त्यांनी अजितदादांशी पंगा घेतला आहे. त्यांना उद्धव ठाकरे सहन करू शकतात. मात्र, अजित पवार नाही, असे म्हणत शिवसेना आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास बांधील नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर राऊत यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवारांना दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्‍यता अनेकांकडून केली जात आहे.

राऊतांच्या पवारांवरील वक्तव्यावर शिरसाट म्हणाले, संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हते. आधी ज्याप्रकारे पहिली उद्धव ठाकरेंची शिवसेना डुबविण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे ते महाविकास आघाडी बुडविणार. आता तर राऊतांनी अजित दादांशी पंगा घेतला आहे. राऊतांना उद्धव ठाकरे सहन करु शकतात. मात्र अजित पवार त्यांना सहन करणार नाहीत.

संदर्भ : https://www.dainikprabhat.com

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

आता शर्मा नव्हे वर्मा! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जान बनलाय ‘तिलक’, पाहा आतापर्यंतची दमदार आकडेवारी

 आता शर्मा नव्हे वर्मा! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जान बनलाय ‘तिलक’, पाहा आतापर्यंतची दमदार आकडेवारी


इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ‌‌5 बाद 192 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर तिलक वर्मा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीने मुंबईला ही धावसंख्या गाठता आली. या हंगामात आतापर्यंत तिलक वर्मा हा मुंबईच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे.

कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीनंतर तिलक वर्मा याच्याकडून संघाला पुन्हा एकदा अपेक्षा होती. त्याने आपल्या संघ व चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण केली. त्याने अवघ्या 17 चेंडूवर 37 धावा करताना 2 चौकार व 4 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 217 पेक्षाही जास्त राहिला.

या हंगामात तिलक हा मुंबईच्या फलंदाजीची धुरा वाहताना दिसतोय. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 84 धावांची नाबाद खेळी केलेली. त्यानंतरही त्याने 22, 41 व‌ 30 धावा करताना प्रत्येक वेळी आपले योगदान दिले. त्यानंतर या सामन्यात देखील त्याने संघासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा बनवल्या.

या हंगामात आतापर्यंत त्याने 53.50 च्या शानदार सरासरीने 214 धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158 असा जबरदस्त राहिला आहे. त्याने मागील वर्षी देखील मुंबईसाठी अशीच चमकदार कामगिरी करताना 36 पेक्षा जास्तच्या सरासरीने 397 धावा काढल्या होत्या.

संदर्भ : https://mahasports.in/



सोमवार, १७ एप्रिल, २०२३

अवकाळी काळ बनून आला होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू.. तीन गंभीर जखमी

 


पिंपरी – अवकाळी पाऊस काळ बनून अवतरल्याचे किवळे परिसरात दिसून आले. मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे आडोशाला थांबलेल्या बांधकाम मजुरांवर काही टनाचे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत तीन जण जखमी झाले. ही घटना कात्रज-देहूरोड द्रुतगती महामार्गावर किवळे येथे सोमवारी (दि. 17) सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. कटरच्या सहाय्याने होर्डिंग कापून, 8 क्रेन व एक जेसीबीचा वापर करून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले.

अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड), शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड), वर्षा केदारे (वय 40, शितलनगर, देहूरोड), भारती मंचळ (वय 30, शितलनगर, देहूरोड), राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्‍तींची नावे आहेत.

तर विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश),रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे) व रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड) हे या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, बंगळुरु महामार्गावर किवळे येथे एका बांधकाम व्यावसायिकाची जाहिरात असलेले होर्डिंग होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजूच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांनी होर्डिंग खाली असलेल्या पंक्‍चरच्या दुकानाचा आडोसा घेतला.

त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने शेकडो टनाचे भले मोठे लोखंडी होर्डिंग पंक्‍चरच्या दुकानावर कोसळले. त्यामुळे पंक्‍चरच्या दुकानात थांबलेले मजूर होर्डिंगखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले ल. कटरच्या सहाय्याने होर्डिंगचे रॉड तोडून जखमी मजुरांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पाचजण मयत असल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. तर, तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. उल्लेखनीय बाब अशी की यापूर्वी देखील पिंपरी-चिंचवड शहरात वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तरीदेखील यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे किवळे येथील घटनेने दिसून येत आहे.

संदर्भ:  https://www.dainikprabhat.com

मॅक्सवेल-प्लेसिसची फिफ्टी व्यर्थ, बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात चेन्नईचा दणदणीत विजय

 मॅक्सवेल-प्लेसिसची फिफ्टी व्यर्थ, बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात चेन्नईचा दणदणीत विजय


 सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात तिसऱ्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लढत झाली. हा सामना चेन्नई संघाने 8 धावांनी आपल्या खिशात घालत स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला. चेन्नईच्या या विजयात आधी फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या विजयासह चेन्नईला गुणतालिकेतही फायदा झाला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 8 विकेट्स गमावत 218 धावाच करता आल्या. अशाप्रकारे चेन्नईने 8 धावांनी विजय मिळवत तिसरा विजय मिळवला.

बेंगलोरकडून फलंदाजी करताना अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 36 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस यानेही 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिक (28), सुयस प्रभुदेसाई (19) आणि शाहबाज अहमद (12) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली. महिपाल लोमरोर याला शून्य धावेवर तंबूत परतावे लागले.

यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 45 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मथीशा पथिराना यानेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, आकाश सिंग, महीश थीक्षणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.तत्पूर्वी चेन्नईकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 45 चेंडूत 83 धावांचा पाऊस पाडला. त्याने यावेळी 6 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त शिवम दुबे यानेही 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तसेच, अजिंक्य रहाणे (37), मोईन अली (नाबाद 19), अंबाती रायुडू (14) आणि रवींद्र जडेजा (10) यांनी दोन आकडी धावा केल्या. यावेळी ऋतुराज गायकवाड 3 धावांवर तंबूत परतला, तर एमएस धोनी (MS Dhoni) 1 धावेवर नाबाद राहिला.

यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना सहाच्या सहा गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यात मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार विषक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांचा समावेश होता.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला. चेन्नईचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. (Chennai Super Kings won by 8 runs against Royal Challengers Bangalore)

संदर्भ: https://mahasports.in

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...