संजय राऊत “मविआ’ बुडविणार; संजय शिरसाट यांची टीका
मुंबई – संजय राऊत आता महाविकास आघाडी बुडविणार आहेत. त्यांनी अजितदादांशी पंगा घेतला आहे. त्यांना उद्धव ठाकरे सहन करू शकतात. मात्र, अजित पवार नाही, असे म्हणत शिवसेना आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास बांधील नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर राऊत यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवारांना दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अनेकांकडून केली जात आहे.
राऊतांच्या पवारांवरील वक्तव्यावर शिरसाट म्हणाले, संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हते. आधी ज्याप्रकारे पहिली उद्धव ठाकरेंची शिवसेना डुबविण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे ते महाविकास आघाडी बुडविणार. आता तर राऊतांनी अजित दादांशी पंगा घेतला आहे. राऊतांना उद्धव ठाकरे सहन करु शकतात. मात्र अजित पवार त्यांना सहन करणार नाहीत.
संदर्भ : https://www.dainikprabhat.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा