मॅक्सवेल-प्लेसिसची फिफ्टी व्यर्थ, बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात चेन्नईचा दणदणीत विजय
सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात तिसऱ्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लढत झाली. हा सामना चेन्नई संघाने 8 धावांनी आपल्या खिशात घालत स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला. चेन्नईच्या या विजयात आधी फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या विजयासह चेन्नईला गुणतालिकेतही फायदा झाला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 8 विकेट्स गमावत 218 धावाच करता आल्या. अशाप्रकारे चेन्नईने 8 धावांनी विजय मिळवत तिसरा विजय मिळवला.
बेंगलोरकडून फलंदाजी करताना अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 36 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस यानेही 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिक (28), सुयस प्रभुदेसाई (19) आणि शाहबाज अहमद (12) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली. महिपाल लोमरोर याला शून्य धावेवर तंबूत परतावे लागले.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 45 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मथीशा पथिराना यानेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, आकाश सिंग, महीश थीक्षणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.तत्पूर्वी चेन्नईकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 45 चेंडूत 83 धावांचा पाऊस पाडला. त्याने यावेळी 6 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त शिवम दुबे यानेही 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तसेच, अजिंक्य रहाणे (37), मोईन अली (नाबाद 19), अंबाती रायुडू (14) आणि रवींद्र जडेजा (10) यांनी दोन आकडी धावा केल्या. यावेळी ऋतुराज गायकवाड 3 धावांवर तंबूत परतला, तर एमएस धोनी (MS Dhoni) 1 धावेवर नाबाद राहिला.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना सहाच्या सहा गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यात मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार विषक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांचा समावेश होता.
या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला. चेन्नईचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. (Chennai Super Kings won by 8 runs against Royal Challengers Bangalore)
संदर्भ: https://mahasports.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा