मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (16 एप्रिल) दुपारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. त्याचवेळी या सामन्यात भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल पदार्पण केले. या सामन्यासाठी अर्जुनची बहिण सारा ही मैदानात उपस्थित होती. आपल्या भावाला पदार्पण करताना पाहून तिचे डोळे पाणावले.
नियमित कर्णधार रोहित शर्मा तब्येत बरी नसल्याने या सामन्यात उतरला नाही. त्याच्याजागी अनुभवी सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. या सामन्यात मुंबईसाठी सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. त्याने अर्शद खानची जागा घेतली. अर्जुन हा अंतिम अकरामध्ये आहे हे समजताच त्याची मैदानावर उपस्थित असलेली बहीण सारा ही आनंदाने टाळ्या वाजवू लागली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्जुनला दिली. अर्जुनने पहिला चेंडू टाकला त्यावेळी सारा हिच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या. साराने या सामन्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींसह हजेरी लावली.
अर्जुनने सामन्यातील पहिले षटक टाकताना केवळ पाच धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या शतकात गोलंदाजीला आल्यावर वेंकटेश अय्यर याने त्याला एक चौकार व एक षटकार खेचला.
संदर्भ: https://mahasports.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा