टापरेवाडी (माधवनगर, ता. भोर)) येथील वीर जवान मंगेश एकनाथ टापरे (वय 45) यांना पंजाब राज्यातील अंबाला येथे देशसेवेत कर्तव्य बाजावत असताना वीर मरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी मनिषा, मुलगी श्रुतिका, वडील माजी सैनिक एकनाथ टापरे, आई सुभद्राबाई टापरे, बंधू असा परिवार आहे.
मंगेश टापरे हे भारतीय वायु सेना दलात ज्युनिअर वॉरंट आफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मूळगावी टापरेवाडी येथे भारतीय वायुसेना दलातर्फे मानवंदना देऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टापरेवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी सासुश्रु नयनांनी आदरांजली अर्पण केली. मंगेश टापरे यांच्या निधनाने टापरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा