गुरुवार, ३० मार्च, २०२३

मुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा ! नेमकं काय होत प्रकरण ‘जाणून घ्या’...

 


मुंबई – अभिनेता सलमान खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. या निकालामुळे बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

2019 मध्ये अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने सलमान खानवर काही आरोप केले होते. सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप पत्रकाराने केला होता. पत्रकाराने सर्वप्रथम याबाबत अंधेरीतील दंडाधिकार्‍यांकडे तक्रार केली.

पत्रकाराच्या वकिलाने तक्रार दाखल करताना सांगितले होते की, अशोक पांडे 2019 मध्ये सलमानसोबत फोटो काढत असताना अभिनेत्याच्या अंगरक्षकांनी त्याचा फोन हिसकावून मारहाण केली. सलमानने आपल्याला धमक्याही दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. मात्र, आज हायकोर्टाने सर्व आरोप निराधार ठरवत सलमानला या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...