नगर - जिल्हा पोलीस दल आस्थापनेवर पोलिस शिपाई भरती – 2021 ची लेखी परीक्षा येत्या रविवारी दि. 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता पोलीस कवायत मैदानावर (पोलिस मुख्यालय, सर्जेपुरा, अहमदनगर) घेण्यात येणार आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र आहेत, अशा पात्र उमेदवारांनी दि. 2 एप्रिल पहाटे 4.30 वाजता पोलीस कवायत मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
उमेदवारांनी या लेखी परीक्षेसाठी येताना पोलिस भरती-2021 ओळखपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो, ऑनलाईन प्राप्त लेखी परीक्षेचे हॉल तिकीट, स्वतःचे ओळखपत्र (उदा. पॅनकार्ड /आधारकार्ड /निवडणूक ओळखपत्र इत्यादीपैकी एक) घेऊन उपस्थित राहावे. तसेच महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे.
लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. लेखी परीक्षेकरीता उमेदवारांना सकाळी 8.45 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल.सकाळी 8.45 वाजल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा