मंगळवार, १४ मार्च, २०२३

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू...

 

BMC Recruitment 2023: मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
14 March 2023, 


Government Job 2023: मुंबई महानगरपालिकेत संगणक सहाय्यक पदासाठी ६०० हून अधिक अर्ज मागविण्यात आले आहेत.

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेने संगणक सहाय्यकच्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या १५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

मुंबई महानगरपालिकेने संगणक सहाय्यक पदासाठी ६०० हून अधिक अर्ज मागिवले आहेत. या पदासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आजपासून (१३ मार्च २०२३) अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. या पदासाठी वयोमर्यात ४५ ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट portal.mcgm.gov.in भेट द्या.

  • शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय (उच्चस्तर/ निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराने एमएस-सीआयटी अभ्यासक्रम शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पूर्ण केलेला असावा. तसेच याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने मराठी ३० शब्द (प्रति मिनिट) व इंग्रजी ४० शब्द (प्रति मिनिट) या वेगाने टायपिंग परीक्षा शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेली हवी. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका असावा. याशिवाय, उमेदवाराला एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत संगणक प्रणालींची माहिती असायला हवी.

पगार किती?

संगणक सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला दरमहा १८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

महत्त्वाची माहिती.



महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.




© 2023 ग्रामीण विकास.Com •

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...