मुंबई – अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सध्या नागराज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. अश्यातच नागराज मंजुळेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याचा हा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे .
नागराज मंजुळे कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता एक वेगळ्या कारणामुळे नागराज मंजुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच, नागराज मंजुळे यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर भन्नाट रील बनवला आहे. सध्या त्याचा रील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओत नागराज पीएसआय पल्लवी जाधव यांच्याबरोबर दिसत आहे. चित्रपटातील ‘हान की बडीव’ या गाण्यावर नागराज मंजुळे यांनी व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये नागराज मंजुळे पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत जाधव यांनी कॅप्शनमध्ये ‘तुफानी मामला… ‘घर बंदूक बिरयाणी’ नागराज सर यांचा नवीन चित्रपट येतोय, 7 एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.’ असं म्हंटलं आहे.
सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून, हा रील अनेकांनी शेअर सुद्धा केला आहे. पल्लवी जाधव दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची देखील आवड आहे. त्यांनी 2020 साली जयपूर येथे पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत रनर अप ठरल्या होत्या.
तर, नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे.त्यामुळेच आता या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
https://www.instagram.com/reel/Cqm2RYqIPJ-/?utm_source=ig_web_button_share_sheet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा