मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ‘मृणाल ठाकूर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून मृणालच्या अभिनयाचं कौतुक होत असतं. अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट मृणालने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतंच मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. नेहमीच क्युट आणि सोज्वळ दिसणाऱ्या मृणालनं या फोटो दरम्यान सर्व मर्यादा मोडल्या आहेत. तिचा हा बोल्ड अँड हॉट लूक फॅन्सला तुफान आवडला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून ज्या पद्धतीने आपली स्टाईल पसरवली आहे, त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. पण, अनेक यूजर्सनी तिचे फोटो ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. मृणाल बीचवर तिचा बिकिनी लूक दाखवत आहे. नेटकऱ्यांना देखील तिचा बोल्ड अवतार प्रचंड आवडला असून, कमेंट बॉक्स मध्ये फॅन्स तुफान प्रतिक्रिया देत आहेत. ‘सुपर 30’, ‘बाटला हाऊस’ आणि ‘जर्सी’ या सारख्या चित्रपटांमध्ये मृणालने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.
Source : https://www.dainikprabhat.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा