मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

सकाळी सकाळी मोठ्या उत्साहात मित्राला भेटण्यासाठी निघाला पण रस्त्यातच मृत्यूने गाठलं..!

 तरुण नागपूर येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता. सुट्टीनिमित्त गोंदियात गावी आला. गावी आल्यानंतर मित्राला भेटायला घरुन गेला, तो पुन्हा परतलाच नाही. यानंतर घरी थेट त्याचा मृतदेहच आला.


गोंदिया: मित्राला भेटायला चाललेल्या तरुणाचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाल्याची घटना गोंदियात आज सकाळी घडली. कारने मित्रासोबत जात असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात पलटी झाली. यानंतर कारमधील तरुण बाहेर फेकला अन् गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. यात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव-नवेगांवबांध मार्गावर माँ पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. डेव्हिड धनराज रहिले असे मयत तरुणाचे नाव आहे. तर वैभव उमेश राजाभोज असे कार चालकाचे नाव आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तरुण

डेव्हिड रहिले हा तरुण नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तीन दिवसापूर्वीच तो सुट्टीनिमित्त अर्जुनी मोरगावला आपल्या गावी आला होता. गावातीलच त्याचा मित्र वैभव उमेश राजाभोज याने त्याला सकाळीच भेटण्यासाठी बोलावले होते. तो वैभवला भेटला. मग दोघे जण त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने निघाले. वैभव हा कार चालवत होता, तर डेव्हिड शेजारी बसला होता.


कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

दरम्यान त्यांनी अर्जुनी मोरगाव -नवेगांवबांध मार्गावरील माँ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तिथून भरधाव वेगाने नवेगांवबांधकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणी रस्त्यावरच्या दिशादर्शक फलकाला तोडून शंभर फूट चारचाकी उलटत गेली. सदर गाडीतून मृतक हा फुटबॉलसारखा गाडीपासून 60 ते 70 फुटांवर जाऊन पडला. यात तो जागीच ठार झाला.

अर्जुनी मोरगाव पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. डोव्हिडचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...