सोमवार, ३ एप्रिल, २०२३

#IPL2023 : सर्वात महागडे खेळाडू ठरले सुपरफ्लॉप, पहिल्याच सामन्यात…

आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहे. 

लिलावात काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.. पण पहिल्या सामन्यात त्यांची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. मग तो सॅम करन असो, बेन स्टोक्स असो किंवा कॅमेरून ग्रीन असो. पहिल्या सामन्यात सर्व स्टार्स फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सपशेल अपयशी ठरताना दिसले. आज आम्ही तुम्हाला IPL 2023 च्या त्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगणार आहोत ज्यांना संघांनी खूप महागड्या किंमतीत खरेदी केले आहे.

1. सॅम करन

पंजाब किंग्जचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला सर्वात महाग म्हणजे 18.25 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 17 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत 4 षटकात 38 धावा देत 1 विकेट घेतली आहे.

2. कॅमेरून ग्रीन

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पहिल्या सामन्यात असहाय्य दिसत होता. पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने 2 षटकात 30 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

3. हॅरी ब्रुक

सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक पहिल्याच सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. राजस्थानविरुद्ध फलंदाजीला आलेल्या ब्रूकने 21 चेंडूत केवळ 13 धावा केल्या.

4. बेन स्टोक्स

चेन्नईचा पुढचा कर्णधार मानला जाणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पहिल्या सामन्यातही पूर्णपणे अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला केवळ 7 धावा करता आल्या . त्याचवेळी गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नाही.

5. केएल राहुल

केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींना विकत घेतले. मात्र, पहिल्या सामन्यात राहुल फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ 8 धावा केल्या होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...