Marathi pattern Post
Updated: Thu 28 March 2023
गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द काय आहे कोर्टाचा निकाल
एसटी आंदोलनावेळी चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाने मोठा झटका दिला आहे. गुणरत्न सदावर्तेंची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी वकिली गणवेश, बँड घालून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाने गुणरत्न सदावर्तेंवर ही कारवाई केली आहे.
वकील सुशील मंचरकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात शिस्त पालन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालण्याच्या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते असे म्हणण्यात आले होते. याचबद्दल मंगळारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाच्या तीन सदस्यीय समितीने निकाला दिला आणि सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी सनद रद्द करण्यात आली.
तक्रारदार वकिल सुशील मंचरकर म्हणाले की, बार कौन्सिल ऑफ इंडियाने नियम ७ प्रमाणे वकिलांना सार्वजनिक ठिकाणी गाऊन आणि बँड घालण्यावर बंदी घातली होती. याचेच उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याचे दिसल्याने मी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीबाबत तीन सदस्यीय समितीने निकाल देऊन गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा