लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी शनिवारी म्हणाले होते, ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’ राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील या वक्तव्यावरून फूट पडत असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वाचे विचारवंत वीर सावरकर यांची पूजा करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये.
दरम्यान, राज्यातील राजकारण राहुल गांधींच्या वक्तव्यावरून तापले आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुतांश नेत्यांनी आपले प्रोफाईल डीपी बदलले आहेत. ‘मी सावरकर’, ‘आम्ही सारे सावरकर’ असे डीपी नेत्यांच्या प्रोफाईलवर दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपला फेसबुकवरील प्रोफाईल डीपी बदलला असून ‘आम्ही सारे सावरकर’ तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी सावरकर’ असा डीपी ठेवला आहे.
सर्वसामान्य नागरिक संतप्त
गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. यावरून सर्वसामान्य जनता मात्र संतापली आहे. नेत्यांनी महापुरूषांवरून राजकारण करत न बसता लोकहिताची कामे करावीत, विकासकामांकडे लक्ष द्यावे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत.
दरम्यान,हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आता मध्यस्थी करत राहुल गांधींना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. आणि राहुल गांधी यांनीही शरद पवार यांचा सल्ला मान्य करून सावरकर मुद्यावर आक्रमक होणार नसल्याचे सांगितले आहे.
राहुल गांधींनी ऐकला शरद पवारांचा सल्ला, सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणे टाळणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वादाला तोंड फुटले आहे. या विधानानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही परस्पर वाद सुरू झाला आहे. हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आता मध्यस्थी करत राहुल गांधींना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) आघाडीत तेढ निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर शिवसेनेने सर्वाधिक नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि उद्धव गटातील तणाव वाढल्यानंतर मंगळवारी उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची मते भिन्न आहेत, मात्र त्यांनी लोकशाहीसमोरील आव्हानांकडे लक्ष दिले पाहिजे.
दोन्ही पक्षांच्या विचारधारा भिन्न
राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुमचे स्वतःचे मत आहे, आमचे स्वतःचे मत आहे. ही विचारसरणीची बाब आहे आणि मी त्याचा आदर करतो. मात्र आज लोकशाहीला धोका निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असून आम्ही एकजूट आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुद्द्यावरून तणाव असताना राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना आश्वासन दिले की ते सावरकरांच्या मुद्द्यांवर बोलणे टाळतील.
राहुल गांधींचे ते विधान काय होते?
लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी शनिवारी म्हणाले होते, ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’ राहुल यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने (UBT) तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ते हिंदुत्वाचे विचारवंत वीर सावरकर यांची पूजा करतात आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये.
उद्धव ठाकरे गटाचा बैठकीवर बहिष्कार
या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या बैठकीतही शिवसेनेच्या ठाकरे गटाने सहभाग घेतला नाही. वाढत्या मतभेदांदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शांतता प्रस्थापित करणारे म्हणून पुढे आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विरोधकांच्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सल्ला दिला होता की, राहुल यांनी अशा वक्तव्यांपासून दूर राहावे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी या बैठकीतच सावरकरांचा उल्लेख टाळण्याचे आश्वासन दिले.
उद्धव ठाकरेंनी राहुल यांना इशारा दिला होता
राहुल यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल यांच्याविरोधात आक्रमक झाले आणि त्यांनी वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करू नका, असा इशारा दिला. सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले होते. नाशिकजवळील मालेगाव शहरात मोठ्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मराठी माणसाचे प्रेरणास्थान असलेल्या वीर सावरकरांबद्दल कोणतेही अपमानास्पद वक्तव्य आपण खपवून घेणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा