नवी दिल्ली – सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च वरून 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सिबीडीटी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वीही आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत अनेकदा वाढवली गेली आहे.
सर्वप्रथम, त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती. त्यानंतर लिंकिंग प्रक्रिया विनामूल्य होती. 1 एप्रिल 2022 पासून 500 रुपये शुल्क आकारण्यात आले आणि 1 जुलै 2022 पासून शुल्क 1,000 रुपये करण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात संसदेत सादर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 61,73,113 (6.17 कोटी) वैयक्तिक पॅनपैकी 46,70,66,691 (4.67 कोटी) पॅन-आधार लिंक्ड होते.
आता पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास, अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाते उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272इ अंतर्गत तुम्हाला 10 हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
या पॅनकार्डधारकांना मिळाला दिलासा
आयकर कायदा 1961 अंतर्गत, काही लोकांना आधारशी पॅन लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे. या गटात आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयातील लोक, अनिवासी, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
आपले पॅन-आधार लिंक करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 👇
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा