रविवार, २ एप्रिल, २०२३

#IPL2023 #RCBvMI : कोहली आणि डुप्लेसिसचा झंझावत; RCB चा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय


बंगळुरू - कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्या झंझावती अर्धशकती खेळीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्स वर दणदणीत विजय मिळवला. मुबंई इंडियन्सने दिलेले 172 धावांचे लक्ष्य  रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 16.2 षटकांत 172 धावा करत पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकार लगावले. कर्णधार फाफ डुप्लेसिसने 43 चेंडूत 73 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. डुप्लेसिस बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या दिनेश कार्तिकला खातेही उघडता आले नाही. तीन चेंडूंचा सामना करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर तो टिळक वर्माकरवी झेलबाद झाला. कार्तिकनंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीजवर आला. त्याने  3 चेंडूत  नाबाद 12 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 171 अशी समाधानकारक मजल मारली मारत  बंगळुरूसमोर 172 धावाचं लक्ष्य ठेवलं. एकवेळ धावांची शंभरी तरी पार करणार का, असे चित्र असताना वर्माने केलेली खेळी बंगळुरूसमोर आव्हान निर्माण करणारी ठरली.

बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ईशान किशनने सुरुवात धडाक्‍यात करत 2 चौकार फटकावले. मात्र, विनाकारण फटका खेळून तो 10 धावांवर महंमद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर बाद होण्याची जणू स्पर्धाच लागली होती.

कर्णधार रोहित शर्मा याने साफ निराशा केली. अवघी एक धाव काढून तो तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील 5 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावांवर परतला. यावेळी तिलक वर्मा खेळपट्टीवर आला व त्याने संघाचा डाव सावरला. त्याने नेहाल वधेराला साथीला घेत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.

वधेरा स्थिरावला असे वाटत असतानाच 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 21 धावांवर बाद झाला. टीम डेव्हीड व हृतिक शोकीनही अपयशी ठरले. समोरून एकेक फलंदाज बाद होत असताना तिलक वर्माने अर्धशतक पूर्ण केले. तसेच संघाचा डाव एकहाती सावरताना संघाला दीडशतकी धावसंख्येच्या पुढे मजल मारून दिली. त्याने नाबाद 84 धावांची अविश्‍वसनीय खेळी केली. त्यात त्याने 46 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.

तळात अर्शद खानने नाबाद 15 धावांची खेळी करत तिलकला साथ दिली. बंगळुरूकडून कर्ण शर्माने सर्वाधिक 2 गडी बाद केले. रीस टोपले, मायकल ब्रेसवेल, महंमद सिराज, आकाशदीप व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत सुमार कामगिरी कायम राखली. त्याच्यासह प्रमुख फलंदाज साफ अपयशी ठरले.

संदर्भ - https://www.dainikprabhat.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...