Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्रकार ? Domain Name म्हणजे काय ? Domain Name कसे तयार करायचे ?"
- Domain Name म्हणजे काय ?
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत 5 बाद 192 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर तिलक वर्मा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीने मुंबईला ही धावसंख्या गाठता आली. या हंगामात आतापर्यंत तिलक वर्मा हा मुंबईच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे.
कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीनंतर तिलक वर्मा याच्याकडून संघाला पुन्हा एकदा अपेक्षा होती. त्याने आपल्या संघ व चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण केली. त्याने अवघ्या 17 चेंडूवर 37 धावा करताना 2 चौकार व 4 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 217 पेक्षाही जास्त राहिला.
या हंगामात तिलक हा मुंबईच्या फलंदाजीची धुरा वाहताना दिसतोय. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 84 धावांची नाबाद खेळी केलेली. त्यानंतरही त्याने 22, 41 व 30 धावा करताना प्रत्येक वेळी आपले योगदान दिले. त्यानंतर या सामन्यात देखील त्याने संघासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा बनवल्या.
या हंगामात आतापर्यंत त्याने 53.50 च्या शानदार सरासरीने 214 धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158 असा जबरदस्त राहिला आहे. त्याने मागील वर्षी देखील मुंबईसाठी अशीच चमकदार कामगिरी करताना 36 पेक्षा जास्तच्या सरासरीने 397 धावा काढल्या होत्या.
संदर्भ : https://mahasports.in/
पिंपरी – अवकाळी पाऊस काळ बनून अवतरल्याचे किवळे परिसरात दिसून आले. मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे आडोशाला थांबलेल्या बांधकाम मजुरांवर काही टनाचे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत तीन जण जखमी झाले. ही घटना कात्रज-देहूरोड द्रुतगती महामार्गावर किवळे येथे सोमवारी (दि. 17) सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. कटरच्या सहाय्याने होर्डिंग कापून, 8 क्रेन व एक जेसीबीचा वापर करून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले.
अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड), शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड), वर्षा केदारे (वय 40, शितलनगर, देहूरोड), भारती मंचळ (वय 30, शितलनगर, देहूरोड), राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तर विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश),रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे) व रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड) हे या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, बंगळुरु महामार्गावर किवळे येथे एका बांधकाम व्यावसायिकाची जाहिरात असलेले होर्डिंग होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजूच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांनी होर्डिंग खाली असलेल्या पंक्चरच्या दुकानाचा आडोसा घेतला.
त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने शेकडो टनाचे भले मोठे लोखंडी होर्डिंग पंक्चरच्या दुकानावर कोसळले. त्यामुळे पंक्चरच्या दुकानात थांबलेले मजूर होर्डिंगखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले ल. कटरच्या सहाय्याने होर्डिंगचे रॉड तोडून जखमी मजुरांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पाचजण मयत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर, तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. उल्लेखनीय बाब अशी की यापूर्वी देखील पिंपरी-चिंचवड शहरात वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तरीदेखील यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे किवळे येथील घटनेने दिसून येत आहे.
संदर्भ: https://www.dainikprabhat.com
सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात तिसऱ्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लढत झाली. हा सामना चेन्नई संघाने 8 धावांनी आपल्या खिशात घालत स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला. चेन्नईच्या या विजयात आधी फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या विजयासह चेन्नईला गुणतालिकेतही फायदा झाला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 8 विकेट्स गमावत 218 धावाच करता आल्या. अशाप्रकारे चेन्नईने 8 धावांनी विजय मिळवत तिसरा विजय मिळवला.
बेंगलोरकडून फलंदाजी करताना अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 36 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस यानेही 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिक (28), सुयस प्रभुदेसाई (19) आणि शाहबाज अहमद (12) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली. महिपाल लोमरोर याला शून्य धावेवर तंबूत परतावे लागले.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 45 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मथीशा पथिराना यानेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, आकाश सिंग, महीश थीक्षणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.तत्पूर्वी चेन्नईकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 45 चेंडूत 83 धावांचा पाऊस पाडला. त्याने यावेळी 6 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त शिवम दुबे यानेही 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तसेच, अजिंक्य रहाणे (37), मोईन अली (नाबाद 19), अंबाती रायुडू (14) आणि रवींद्र जडेजा (10) यांनी दोन आकडी धावा केल्या. यावेळी ऋतुराज गायकवाड 3 धावांवर तंबूत परतला, तर एमएस धोनी (MS Dhoni) 1 धावेवर नाबाद राहिला.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना सहाच्या सहा गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यात मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार विषक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांचा समावेश होता.
या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला. चेन्नईचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. (Chennai Super Kings won by 8 runs against Royal Challengers Bangalore)
संदर्भ: https://mahasports.in
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (16 एप्रिल) दुपारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. त्याचवेळी या सामन्यात भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल पदार्पण केले. या सामन्यासाठी अर्जुनची बहिण सारा ही मैदानात उपस्थित होती. आपल्या भावाला पदार्पण करताना पाहून तिचे डोळे पाणावले.
नियमित कर्णधार रोहित शर्मा तब्येत बरी नसल्याने या सामन्यात उतरला नाही. त्याच्याजागी अनुभवी सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. या सामन्यात मुंबईसाठी सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. त्याने अर्शद खानची जागा घेतली. अर्जुन हा अंतिम अकरामध्ये आहे हे समजताच त्याची मैदानावर उपस्थित असलेली बहीण सारा ही आनंदाने टाळ्या वाजवू लागली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्जुनला दिली. अर्जुनने पहिला चेंडू टाकला त्यावेळी सारा हिच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या. साराने या सामन्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींसह हजेरी लावली.
अर्जुनने सामन्यातील पहिले षटक टाकताना केवळ पाच धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या शतकात गोलंदाजीला आल्यावर वेंकटेश अय्यर याने त्याला एक चौकार व एक षटकार खेचला.
संदर्भ: https://mahasports.in
लखनौ -पाकिस्तानात जन्मलेल्या परंतु झिम्बाव्बेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सिकंदर रझाने आयपीएलच्या 21 सामन्यात आधी गोलंदाजी मग नंतर फलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करताना लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. लखनौचा कर्णधार के.एल.राहुलची 74 धावांची अर्धशतकीय खेळी मात्र या पराभवामुळे व्यर्थ ठरली.
लखनौचे 159 धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अथर्व तायडे शून्यावर बाद झाला. यदुवीर सिंगने त्याला बाद केले. त्यानंतर यदुवीरने त्यानंतर प्रभसिमरन सिंगला 4 धावांवर बाद करत पंजाबची अवस्था 2 बाद 17 अशी केली.
यानंतर मॅथ्यू शॉर्टने 22 चेंडूत आक्रमक 34 धावा केल्या. मात्र के गौतमने त्याचा अडसर दूर करत पंजाबला तिसरा धक्का दिला. यानंतर हरप्रीत सिंग भाटियाला क्रुणाल पांड्याने 22 धावांवर बाद केले. पंजाबची एकीकडे पडझड सुरू होती त्यावेळी सिकंदर एकटा भक्कमपणे संभाळत धावा जोडत होता. 18 षटकात सिकंदर बाद झाल्यानंतर शाहरुख खानने 23 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला तीन चेंडू बाकी असताना विजयी केले. लखनौकडून यदुवीरने सर्वाधिक 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाबची धुरा संभाळणाऱ्या सॅम करणने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर कर्णधार राहुलने 56 चेंडूंत 74 धावांची शानदार खेळी करताना लखनौला 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावांचा पल्ला गाठूण दिला.
राहुल बनला 4 हजारी मनसबदार
पंजाबविरुद्ध दमदार अर्धशतक करून कर्णधार राहुल हा आयपीएल इतिहासातील सर्वांत वेगवान 4000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या 4000 धावा 105 डावात पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 112 डावांत 4000 आयपीएल धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. त्याने हा टप्पा गाठण्यासाठी 114 डाव घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स ः 20 षटकांत 8 बाद 159 (के.एल.राहुल 74-56 चेंडू, काईल मेयर्स 29; सॅम करन 3-31, कागिसो रबाडा 2-34, हरप्रित ब्रार 1-10, सिकंदर रझा 1-19, अर्शदिप सिंघ 1-22) पराभूत वि. पंजाब किंग्ज ः 19.3 षटकांत 8 बाद 161 (मॅट शॉर्ट 34, सिकंदर रझा 57-41 चेंडू, शाहरुख खान 23, हरप्रित भाटीया 22; यदुवीर सिंग 2-19, क्रिश्नाप्पा गौतम 1-31, कृणाल पंड्या 1-32, रवि बिश्नोई 2-18)
पुणे -देशातील आयआयटी, एनआयटी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई ऍडव्हान्स परीक्षा येत्या 4 जूनला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जेईई मेन्समधील पात्र ठरलेल्यांची जेईई ऍडव्हान्स परीक्षा देश-विदेशातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. जानेवारीमध्ये पहिले सत्र झालेले असताना नुकतेच एप्रिल महिन्यात जेईई मेन्सचे दुसरे सत्र झाले होते. या दोन्ही परीक्षांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन्हींपैकी सर्वोत्तम पर्सेंटाइल ग्राह्य धरून राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल. या क्रमवारीच्या आधारावर जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता निश्चित होणार आहे.
ही परीक्षा दरवर्षी देशातील आयआयटी संस्थांद्वारे घेण्यात येते. यंदा ही जबाबदारी गुवाहाटी येथील आयआयटीकडे आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
अर्ज करण्यास सुरुवात : 30 एप्रिल
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 7 मे
शुल्क भरण्याची अंतिम मुदत : 8 मे
हॉलतिकीट उपलब्ध : 29 मेपासून
परीक्षेची तारीख : 4 जून
परीक्षेचा निकाल : 24 जून
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केल्यांनतर अनेक राजकीय संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात भाजपा आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील किंवा नियम पूर्ण केला नसेल म्हणून त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला असेल. मी तर दिवसभरात प्रवासात होतो. शेतकऱ्यांच्या शेतात चाललो आहे. मला माध्यमांकडूनच हे कळालं.” “राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतं घ्यावी लागतात. त्यांनी ते नियम पाळले नसतील किंवा त्यात ते कमी पडले असतील. म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली असेल, असे स्पष्ट मत बावनकुळेंनी मांडले आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेत उदय सामंत यांनी, “मला वाटतं हा आजच निर्णय झालेला नाही. यावर कित्येक दिवस निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढलेला नाही, तर तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचंही त्यात नाव आहे.” “‘आप’ पक्षाला नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत आणि त्यात काही पक्ष बसले नसतील म्हणून मान्यता रद्द झाली असेल,” असेही उदय सामंत यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सौजन्य : https://www.dainikprabhat.com/
IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. अजिंक्य रहाणे या विजयाचा हिरो ठरला. शिवाय शिवम दुबे व तुषार देशपांडे या मुंबईकरांनीही CSKच्या विजयात हातभार लावला. MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
आयपीएल २०२३ मध्ये मुंबईला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि आजच्या विजयानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध हल्लाबोल केला. अजिंक्यने २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. अजिंक्यने सेट केलेला टेम्पो ऋतुराज व मुंबईकर शिवम दुबेने ( २८) कायम राखला आणि ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू व ऋतुराजने चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. ऋतुराज ४०, तर रायुडू २० धावांवर नाबाद राहिले. चेन्नईने १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा केल्या.
रोहित म्हणाला, चांगल्या सुरूवातीनंतर आम्ही हरलो.. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्हाला आता अधिक धाडसी खेळ करायला हवा. युवा खेळाडूंच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहिलो आहोत आणि त्यांना वेळ द्यायची गरज आहे. आता संघातील सीनियर्सनी पुढाकार घेऊन चांगले खेळायला हवं, हे मी माझ्याबाबतीतही बोलतोय.. अजून स्पर्धा बाकी आहे आणि आता तो विजयाचा क्षण आणण्याची गरज आहे.
सौजन्य :https://www.lokmat.com/
डोंबिवली: पार्सलचे पैसे देण्याच्या वादातून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये तुफान राडा झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. ही फ्री स्टाईल हाणामारी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात एका सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटाला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावत दोघांवर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
पार्सलचे पैसे देण्यास ग्राहक तयार नव्हता
डोंबिवली लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने ब्लिनकीत कंपनीकडून फूड पार्सल मागवले होते. एक हजार रुपयाचे पनीर आणि इतर खाण्याच्या वस्तू पार्सल मागवले होते. त्यानुसार ब्लिनकीत डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा यांचे पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. मात्र इमारतीत पोहोचल्यानंतर पार्सलचे पैसे देण्यास मिश्रा तयार नव्हता.
पैशाच्या वादातून दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी
पैशाच्या देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद सुरू झाला. यादरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ आणि इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर दुकानांमधील कर्मचारी आणि इतर डिलिव्हरी बॉय यांचा ग्राहक सुनील मिश्रा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
https://www.amazon.in/#:~:text=https%3A//amzn.to/3nXNgyD
सौजन्य : https://www.tv9marathi.com/
सुषमा अंधारे यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर आपल्या भाषणात भूमिका मांडली. “वज्रमूठ सभेनंतर संभाजीनगर येथे गोमूत्र शिंपडले. तुम्ही मुस्लिम, बुद्ध, इतर 18 पगड जातीचा समाजाचा अपमान करताय. या अपमानाचा बदला घ्यायचा. आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो. गोमूत्र शिंपडणारी ही नवनीत राणा प्रवृत्ती आहे ते तुम्हाला माणूस नव्हे तर जनावर समजतात”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.
“जे लोक सोनिया गांधी यांना बदनाम करतात ते सहज सुषमा अंधारेची तुलना राखी सावंत यांच्याशी करतात. निर्लज्ज पानाचा कळस आहे. महिलंचा फोटो मोर्फ करतात. त्यावर पोलीस कारवाई करीत नाहीत. राहुल गांधी यांनाही बदनाम केले गेले. राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू म्हणून टिंगल केली. भारत जोडो यात्रावर टीका केली, उपहास केला. जसा राहुल गांधीना पपू केले तसेच महाराष्ट्रात गांधी यांना बदनाम केले. हिंमत असेल तर मुद्दे मांडा, उत्तर द्या. आदित्य ठाकरे यांना सुरुवातीला बच्चा म्हणून दुर्लक्ष केले. मग पेंग्विन म्हणाले. नंतर बापही मुख्यमंत्री आणमि मुलगाही मंत्री असे केले”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
मुंबई – अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सध्या नागराज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. अश्यातच नागराज मंजुळेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याचा हा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे .
नागराज मंजुळे कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता एक वेगळ्या कारणामुळे नागराज मंजुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच, नागराज मंजुळे यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर भन्नाट रील बनवला आहे. सध्या त्याचा रील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओत नागराज पीएसआय पल्लवी जाधव यांच्याबरोबर दिसत आहे. चित्रपटातील ‘हान की बडीव’ या गाण्यावर नागराज मंजुळे यांनी व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये नागराज मंजुळे पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत जाधव यांनी कॅप्शनमध्ये ‘तुफानी मामला… ‘घर बंदूक बिरयाणी’ नागराज सर यांचा नवीन चित्रपट येतोय, 7 एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.’ असं म्हंटलं आहे.
सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून, हा रील अनेकांनी शेअर सुद्धा केला आहे. पल्लवी जाधव दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची देखील आवड आहे. त्यांनी 2020 साली जयपूर येथे पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत रनर अप ठरल्या होत्या.
तर, नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे.त्यामुळेच आता या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
https://www.instagram.com/reel/Cqm2RYqIPJ-/?utm_source=ig_web_button_share_sheet
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ‘मृणाल ठाकूर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून मृणालच्या अभिनयाचं कौतुक होत असतं. अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट मृणालने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतंच मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. नेहमीच क्युट आणि सोज्वळ दिसणाऱ्या मृणालनं या फोटो दरम्यान सर्व मर्यादा मोडल्या आहेत. तिचा हा बोल्ड अँड हॉट लूक फॅन्सला तुफान आवडला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून ज्या पद्धतीने आपली स्टाईल पसरवली आहे, त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. पण, अनेक यूजर्सनी तिचे फोटो ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. मृणाल बीचवर तिचा बिकिनी लूक दाखवत आहे. नेटकऱ्यांना देखील तिचा बोल्ड अवतार प्रचंड आवडला असून, कमेंट बॉक्स मध्ये फॅन्स तुफान प्रतिक्रिया देत आहेत. ‘सुपर 30’, ‘बाटला हाऊस’ आणि ‘जर्सी’ या सारख्या चित्रपटांमध्ये मृणालने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.
Source : https://www.dainikprabhat.com/
तरुण नागपूर येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता. सुट्टीनिमित्त गोंदियात गावी आला. गावी आल्यानंतर मित्राला भेटायला घरुन गेला, तो पुन्हा परतलाच नाही. यानंतर घरी थेट त्याचा मृतदेहच आला.
गोंदिया: मित्राला भेटायला चाललेल्या तरुणाचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाल्याची घटना गोंदियात आज सकाळी घडली. कारने मित्रासोबत जात असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात पलटी झाली. यानंतर कारमधील तरुण बाहेर फेकला अन् गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. यात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव-नवेगांवबांध मार्गावर माँ पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. डेव्हिड धनराज रहिले असे मयत तरुणाचे नाव आहे. तर वैभव उमेश राजाभोज असे कार चालकाचे नाव आहे.
डेव्हिड रहिले हा तरुण नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तीन दिवसापूर्वीच तो सुट्टीनिमित्त अर्जुनी मोरगावला आपल्या गावी आला होता. गावातीलच त्याचा मित्र वैभव उमेश राजाभोज याने त्याला सकाळीच भेटण्यासाठी बोलावले होते. तो वैभवला भेटला. मग दोघे जण त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने निघाले. वैभव हा कार चालवत होता, तर डेव्हिड शेजारी बसला होता.
दरम्यान त्यांनी अर्जुनी मोरगाव -नवेगांवबांध मार्गावरील माँ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तिथून भरधाव वेगाने नवेगांवबांधकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणी रस्त्यावरच्या दिशादर्शक फलकाला तोडून शंभर फूट चारचाकी उलटत गेली. सदर गाडीतून मृतक हा फुटबॉलसारखा गाडीपासून 60 ते 70 फुटांवर जाऊन पडला. यात तो जागीच ठार झाला.
अर्जुनी मोरगाव पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. डोव्हिडचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहे.
लिलावात काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.. पण पहिल्या सामन्यात त्यांची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. मग तो सॅम करन असो, बेन स्टोक्स असो किंवा कॅमेरून ग्रीन असो. पहिल्या सामन्यात सर्व स्टार्स फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सपशेल अपयशी ठरताना दिसले. आज आम्ही तुम्हाला IPL 2023 च्या त्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगणार आहोत ज्यांना संघांनी खूप महागड्या किंमतीत खरेदी केले आहे.
1. सॅम करन
पंजाब किंग्जचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला सर्वात महाग म्हणजे 18.25 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 17 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत 4 षटकात 38 धावा देत 1 विकेट घेतली आहे.
2. कॅमेरून ग्रीन
मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पहिल्या सामन्यात असहाय्य दिसत होता. पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने 2 षटकात 30 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
3. हॅरी ब्रुक
सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक पहिल्याच सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. राजस्थानविरुद्ध फलंदाजीला आलेल्या ब्रूकने 21 चेंडूत केवळ 13 धावा केल्या.
4. बेन स्टोक्स
चेन्नईचा पुढचा कर्णधार मानला जाणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पहिल्या सामन्यातही पूर्णपणे अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला केवळ 7 धावा करता आल्या . त्याचवेळी गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नाही.
5. केएल राहुल
केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींना विकत घेतले. मात्र, पहिल्या सामन्यात राहुल फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ 8 धावा केल्या होत्या.
महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय
अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,
साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध
धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध
केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या
वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून
घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान
झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रकिया निर्गमित झालेली असून , पात्र शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .( Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात.
पदांचे नावे – सहाय्यक प्राध्यापक , बालरोग सल्लागार , भुलतज्ञ , सल्लागार ,पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी , ऑडीओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट , समुपदेशन मानशास्त्रज्ञ , पुर्णवेळ विशेष शिक्षक , पुणे वेळ विशेष शिक्षक ग्रेड , व्यावसायिक सल्लागार अर्धवेळ.
पात्रता – पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी 684 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 177/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया -जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Paediatric seminar hall 1st Floor T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai या पत्त्यावर दि.31 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहे.
महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय
अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,
साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध
धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध
केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या
वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून
घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान
झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
बंगळुरू - कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्या झंझावती अर्धशकती खेळीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्स वर दणदणीत विजय मिळवला. मुबंई इंडियन्सने दिलेले 172 धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 16.2 षटकांत 172 धावा करत पूर्ण केले.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकार लगावले. कर्णधार फाफ डुप्लेसिसने 43 चेंडूत 73 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. डुप्लेसिस बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या दिनेश कार्तिकला खातेही उघडता आले नाही. तीन चेंडूंचा सामना करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर तो टिळक वर्माकरवी झेलबाद झाला. कार्तिकनंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीजवर आला. त्याने 3 चेंडूत नाबाद 12 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 171 अशी समाधानकारक मजल मारली मारत बंगळुरूसमोर 172 धावाचं लक्ष्य ठेवलं. एकवेळ धावांची शंभरी तरी पार करणार का, असे चित्र असताना वर्माने केलेली खेळी बंगळुरूसमोर आव्हान निर्माण करणारी ठरली.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ईशान किशनने सुरुवात धडाक्यात करत 2 चौकार फटकावले. मात्र, विनाकारण फटका खेळून तो 10 धावांवर महंमद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर बाद होण्याची जणू स्पर्धाच लागली होती.
कर्णधार रोहित शर्मा याने साफ निराशा केली. अवघी एक धाव काढून तो तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील 5 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावांवर परतला. यावेळी तिलक वर्मा खेळपट्टीवर आला व त्याने संघाचा डाव सावरला. त्याने नेहाल वधेराला साथीला घेत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
वधेरा स्थिरावला असे वाटत असतानाच 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 21 धावांवर बाद झाला. टीम डेव्हीड व हृतिक शोकीनही अपयशी ठरले. समोरून एकेक फलंदाज बाद होत असताना तिलक वर्माने अर्धशतक पूर्ण केले. तसेच संघाचा डाव एकहाती सावरताना संघाला दीडशतकी धावसंख्येच्या पुढे मजल मारून दिली. त्याने नाबाद 84 धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्यात त्याने 46 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
तळात अर्शद खानने नाबाद 15 धावांची खेळी करत तिलकला साथ दिली. बंगळुरूकडून कर्ण शर्माने सर्वाधिक 2 गडी बाद केले. रीस टोपले, मायकल ब्रेसवेल, महंमद सिराज, आकाशदीप व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत सुमार कामगिरी कायम राखली. त्याच्यासह प्रमुख फलंदाज साफ अपयशी ठरले.
संदर्भ - https://www.dainikprabhat.com/
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या जवजवळ प्रत्येक हंगामात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत. आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांना काही नवीन नाही. यामध्ये स्पॉट फिक्सिंगशिवाय अनेक घोटाळेही समोर आले आहेत. पण इतक्या सर्व वादानंतरही आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे.
Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...